मुंबई, दि. २८ जून २०२५ – भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे कोकण किनारपट्टीसाठी ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० ते २९ जून सकाळी ११.३० या काळात लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने पुढील २४ तासांत पुणे घाट व सातारा घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे.
🌧️ पावसाची स्थिती: सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक पाऊस
राज्यात मागील २४ तासांत (२८ जून सकाळपर्यंत) झालेल्या पावसाचे जिल्हानिहाय आकडे पुढीलप्रमाणे:
- सर्वाधिक पाऊस: सिंधुदुर्ग – १९ मिमी, पालघर – १६.१ मिमी, रत्नागिरी – १५.२ मिमी
- इतर महत्त्वाचे जिल्हे: कोल्हापूर – १५.२ मिमी, रायगड – ११.९ मिमी, ठाणे – ९.९ मिमी, नागपूर – ८.२ मिमी, सातारा – ७.१ मिमी
राज्यभरात सरासरी पावसाची नोंद झाली असून विदर्भ व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले.
🏞️ कोल्हापूर जिल्ह्यात भू-भेगा; भूस्खलनाचा धोका
कोल्हापूर जिल्ह्यात फये (ता. भुदरगड) गावाजवळ डोंगर उतारावर जमिनीत भेगा पडल्याचे निदर्शनास आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गारगोटी – पाटगाव रस्त्यावरील प्रजिमा ५२ (किमी ५/४००, चोपडेवाडी गावाजवळ) डोंगरातही मोठ्या प्रमाणात भेगा दिसून आल्या असून, सदरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग: गारगोटी – आकुर्डे – करडवाडी – कडगाव – ममदापूर – राज्यमार्ग क्र. १७९
⚠️ दुर्घटना व मृत्यू: निसर्गाचा फटका
राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या दुर्घटनांमध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत:
- धुळे: विज पडून एक प्राणी मृत्यू
- नागपूर: रस्ते अपघातात ९ प्राणी मृत्यू, १६ जखमी
- पालघर: पाण्यात बुडून ३ जणांचा मृत्यू
- यवतमाळ: पोहताना १ जणाचा मृत्यू
- सिंधुदुर्ग: दरीत पडून १ जणाचा मृत्यू
🌀 सावध राहा, सुरक्षित राहा! हवामान खात्याचे व आपत्कालीन केंद्राचे सूचनांचे पालन करून संभाव्य संकटापासून स्वतःचा व आपल्या परिवाराचा बचाव करा.