फ्युचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २४ नोव्हेंबर २०२३
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कापूस, हळद यांच्या किमतीत उतरता कल होता. मका, हरभरा, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या; पण त्या सध्या स्थिर आहेत. २४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव या सप्ताहात ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ५६,४४० वर आले आहेत. जानेवारी फ्युचर्स भाव ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ५७,४८० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.८ टक्क्यानी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.१ टक्क्यांनी वाढून रु. १,४५७ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५३८ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.
मका
NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,१५७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २,१७० वर आल्या आहेत. फ्युचर्स (डिसेंबर डिलिवरी) किमती रु. २,२१० वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स किमती रु. २,२०८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.४ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची देशातील आवक वाढती आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निझामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,४०१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर आहेत. डिसेंबर फ्युचर्स किमती रु. १२,८६२ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. १५,११६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १२.८ टक्क्यांनी जास्त आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,१५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) रु. ८,७०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,३५३ वर आली होती. या सप्ताहात ती ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,३०३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. सोयाबीनची देशातील आवक वाढत आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.७ टक्क्यानी वाढून रु. १०,२६८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यात तुरीच्या किंमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या स्थिर होत आहेत.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,४८८ होती; या सप्ताहात येथील किंमत रु. ३,४२० वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,८७५ वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. २,००० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)