Full Name: Aishwarya Khambekar
City: Nashik
Decoration Theme: निसर्गाच्या सानिध्यात जगातील सर्वात लहान सूक्ष्म गणपती बाप्पाची नाशिक मध्ये विराजमान
सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या यांनी देखाव्यातून दिला पर्यावरण पूरक संदेश! गेली पाच वर्ष आपल्या घरी येणारा गणपती बाप्पा याची आरास इको फ्रेंडली व पर्यावरण पूरक असावी अशी इच्छा होती सोबतच नाशिकच्या जनतेला जगातील सर्वात सूक्ष्म गणपती बाप्पाचे दर्शन व्हावे ही देखील भावना होती हीच भावना लक्षात घेत माझ्या कलेच्या माध्यमातून जगातील सर्वात लहान आणि सूक्ष्म गणपती बाप्पा साकारण्यात काही अंशिका होईना यश आले आहे सोबतच काँग्रेसच्या जंगलात हरवलेल्या गणपती बाप्पाला निसर्गाच्या सानिध्यातून दर्शविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास न व्हावा सोबतच पर्यावरण पूरक गणपतीचे स्थापना करून काँक्रिट च्या जंगलातील हरवलेला गणपती बापा आता निसर्गाच्या सानिध्यात कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण देऊन एक पर्यावरण पूरक संदेश देण्याचा प्रयत्न माझ्या कलेच्या माध्यमातून केला आहे, निसर्गावर व प्राणी पक्षिंवरील प्रेम करणारा गणपती बाप्पा आणि मानवाच्या चुकांमुळे पर्यावरणाचा होणारा रास हे सर्व एकत्रित चित्र मी आपल्या देखाव्यातून दाखवले आहे, चला तर मग आपण सर्व पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करून या आणि एक नयन रम्य व अदभुत सौंदर्याने नटलेल विश्व पुन्हा एकदा निर्माण करू या… गणपती बाप्पा मोरया….
नाशिकच्या सुप्रसिद्ध नामवंत सूक्ष्मचित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या घरी गेली ५ वर्ष गणपतीची स्थापना होते. तर गेले ५ वर्ष आपला गणपती इको फ्रेंडली बाप्पा असावा याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. त्यामुळे ते बाप्पाबरोबर बाप्पाची आरासही इको-फ्रेंडली असण्यावर भर देतात. वसुंधरेचा म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यासाठी नातेवाईक व दरशांनार्थी इको फ्रेंडलीबद्दल माहिती देऊन पर्यावरण पुरक गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या औसरकर या सूक्ष्म चित्रकार असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अष्टविनायकांपैकी सर्व आठ गणपती बाप्पांचे चित्र तीळ वर रेखाटून यावर्षी जगातील सर्वात लहान व डोळ्यांना ही न दिसणारा लहान गणपती बाप्पांचे दर्शन नाशिककरांसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे, विशेष बाब म्हणजे हे सर्व अष्टविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांना भिंगाचा काचेचा वापर करावा लागत आहे, सोबतच जगातील सर्वात लहान गणपती बाबा पाहण्याचा सुवर्णयोग नाशिककरांना ऐश्वर्या औसरकर यांच्या सूक्ष्म कलेच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेच व त्यांनी रेखाटलेल्या देखाव्याचे संपूर्ण नाशिक कर तोंड भरून कौतुक करत आहे, डोळ्यांना ही न दिसणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी एकच गर्दी त्यांच्या घरी केली आहे, त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास न व्हावा सोबतच पर्यावरण पूरक गणपतीचे स्थापना करून त्यांनी परत एकदा काँक्रिट च्या जंगलातील हरवलेला गणपती बापा आता निसर्गाच्या सानिध्यातील कसा असतो त्याचं ज्वलंत उदाहरण देऊन एक पर्यावरण पूरक संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या कलेच्या माध्यमातून केला आहे, निसर्गप्रेमी व प्राणी पक्षिंवरील प्रेम करणारा गणपती बाप्पा आणि मानवाच्या चुकांमुळे पर्यावरणाचा होणारा रास हे सर्व एकत्र चित्र त्यांनी आपल्या देखाव्यातून दाखवले आहे त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
Very nice, very good