Full Name: अपर्णा नाईक
City: नाशिक
Decoration Theme: अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते वाया घालवू नका.
गणपती बाप्पा मोरया! आरास पूर्ण पर्यावरण पूरक इकोफ्रेंडली आहे.गणपतिची मूर्ती लाल मातीची बनवलेली आहे. गणपती विसर्जन घरीच करतो. लाल मातीची मूर्ती असल्याने लवकर विरघळते ती माती झाडाला टाकल्या वर झाड छान फुलते.
यात कार्डशीट, पुठ्ये,माती,जुने खोके , उदबत्तीच्या काड्या, पेपर कटींग असे शक्यतो सगळे घरातील सामान वापरले आहे.त्यामुळे अगदी कमी खर्च आला. अन्न हे पूर्णब्रह्म आहे ते वाया घालवू नका. ही आरास गणपती पुढे केली आहे.
लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, हॉस्पिटल्स्, हॉटेल्स्, आणि घरी आन्नाची नासाडी होते .त्यामुळे पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान होते. त्यासाठी स्वतःच्या घरापासूनच सुरुवात करा . जेवढे लागते तेवढेच ताटात वाढून घ्या.उरलेल्या अन्नाचे खत बनविणे. कार्यक्रमात उरलेले अन्न खराब होण्याआधी भुकेल्या पर्यंत पोहोचवणे. हे उपाय करावे. प्रसाद म्हणून अन्न खायला सुरुवात झाली तर अन्नाचा कण ही वाया जाणार नाही.
धन्यवाद.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा