Full Name: Hemalata Rahul Shimpi
City: Nashik
Decoration Theme: नमस्कार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजत असतान आम्ही शिंपी कुटुंबाने रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा अनोखा आरास साकारला आहे.आम्ही आमच्या घरी गणपती समोर पर्यावरण पूरक आरास साकारला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्ता सुरक्षा हे एक मोठे आव्हान बनले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी हे मुख्यतः शिस्तीचा अभाव आणि वाहतूक नियमांबद्दलचे अज्ञान यामुळे निर्माण होतात.
हॉर्न, सायलेन्सर वाहनांचे कर्णकर्कश्य आवाज, वेगाने वाहन चालवणे आणि त्यामुळे होणारे अपघात. याचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे. “फेरारी की सवारी” या चित्रपटातील संवादातून एक चांगली शिकवण मिळते. “जो देखेगा, वही सीखेगा”. म्हणूनच बालवयात मुलांना वाहतुकीबाबत माहिती दिल्यास चांगले नागरिक घडवू शकतो.
पुढील पिढीमध्ये रहदारी व वाहतुकीच्या नियमांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यासाठी, बालकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा चिन्हांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही रस्ता सुरक्षेला समर्पित असा देखावा तयार केला आहे. “वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा” या आशयावर आधारित हा आरास आहे.
या आरासात कागदी पृष्ठे, आईस्क्रीम स्टिक, ओढण्या, कागदी प्रतिकृती आदी वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. वाहतूक नियम पाळून आणि हेल्मेट परिधान करून बाप्पा दुचाकीवर स्वार होत असल्याची प्रतिकृती शाडू मातीने घडविण्यात आली आहे. विविध रस्ते माहिती फलक, त्यांचे प्रकार, मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी बाटलीची प्रतिकृती आणि स्पीडोमीटर अशा अनेक रचना या देखाव्यात आहेत. बालगोपाळांना वाहन चालवण्याचा अनुभव मिळावा यासाठी बसची प्रतिकृती देखील तयार करण्यात आली आहे.
श्री. शिंपी यांच्या पत्नी सौ. हेमलता (प्रिया) शिंपी, आई सौ. संध्याताई शिंपी आणि मुलगा चि. सत्यजित शिंपी यांनी मिळून हा देखावा साकारला आहे. हा आरास भविष्यातील पिढीला रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करण्यास नक्कीच मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Very Nice decoration
Creative family. Nice topic.
A truly captivating and thought-provoking decoration. It plays an important role in raising awareness and sparking conversations within society.
खूपच छान संकल्पना मांडली आहे. शिंपी परिवारास खूप शुभेच्छा.
Awesome Decoration
समाजप्रबोधनावर आधारीत सुंदर गणेशोत्सव देखावा,नेहेमीप्रमाणेच अप्रतिम कल्पकता
simply great
khup sundar dekhava aahe.
अप्रतिम आरसा. स्पर्धे साठी शुभेच्छा.
Nice Concept & decoration. All the best Beta.
मनमोहक आणि विचारप्रवर्तक अशी सजावट, जी समाजात जनजागृती निर्माण करण्यास आणि अर्थपूर्ण चर्चा घडवून आणण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Amazingly nice decoration
Road Safety is very important and you have chosen a great subject to teach the society about the importance of road safety. Great work Shimpi. Family
beautifully decorated.
ekch number
Very nic
mast
creative family
नाईस देकोरेशन
Very nice concept. need of it.
Amazing decoration. Keep it up Rahul great job.
Ganpati Bappa Morya! All the best.
खूप छान आहे गणपती बाप्पा मोरया
apratim
Bahot badhiya
mast
Heartily congratulations sir, entire shimpi family for well deserve this, in this era everyone is in rush to full thier pockets, but I see evey year your family create such awsom piece of art work and surprise us. Thank you for motivation and Once again congratulations 🎉& keep it up🙌