बाप्पा माझा लाडका

Shravan Pramod Ghodke, Mumbai

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: Shravan Pramod Ghodke

City: Mumbai

Decoration Theme: प्रति,

भक्तजन यांसी,

पत्रास कारण की…. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो समुद्र, नारळाची झाडं, लाल माती, जांभा, आंबे-काजू, भरगच्च हिरवी झाडी आणि इतर काही गोष्टी.. पण कोकणाला एक फार जुना वारसा लाभलाय, तो कातळशिल्पांचा! तर कातळशिल्पं हे प्रकरण नक्की आहे तरी काय? फार फार वर्षांपूर्वी इ.स.पूर्व 40,000 ते 10,000 च्या कालखंडात, मानव जेव्हा शिकारी अवस्थेत भटकत होता तेव्हा त्याने जमिनीवरच्या जांभा खडकात कोरून ठेवलेली ही आद्यकलेचे चित्रं! या अष्मयुगीन माणसांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या सड्यांवर मासा, हत्ती, माकड, शिंगं, वाघ, डुक्कर, कासव, माणूस, पावलं, अनेक भूमितीय आकृती अशी अनेक चित्रं कोरून ठेवली! असंच एक शिल्प व अनेक जलकुंभ असरोंडी गावात (वाडी- भाटपावनी, तालुका – मालवण, जिल्हा – सिंधुदुर्ग) नव्याने मिळालं आहे. या आधीही याच गावामध्ये ‘असरोंडी माध्यमिक विद्यालय’ येथील शिक्षक व विद्यार्थी यांनी अनेक कातळशिल्पे शोधली होती. जांभ्याच्या सड्यांवर कोरलेली कातळशिल्पं प्रदेश तसे निर्मनुष्य आहेत. ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेच्या पटलावरील कातळ शिल्पांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यांचे संवर्धन व संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. सद्य स्थितीस असरोंडी गावामधील चिरेखाण प्रकल्प यामुळे सदर कातळशिल्प यांस धोका उत्पन्न झालेला आहे. जगाला वेड लावणारं असं काही आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आपण त्याचा आदर आणि अभ्यास केला पाहिजे. हे जपलं पाहिजे. कोणा एकाच नाहीये हे.. आपल्या सर्वांचा वारसा आहे हा….. तर चला…. घ्या लेखणी आणि लिहा शासनास पत्र, आणि पोहोचवा कथा असरोंडीच्या कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी. आणि मिळवा आपलाच वारसा वाचवायचे समाधानदेखील..

आपलाच, बाप्पा… सजावटीचा पत्ता: श्रवण प्रमोद घोडके. 101-102, आनंद इस्टेट, ना. म. जोशी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई- 400011 मूर्तिकार: विनोद शिंदे व सहकारी, धारावी, मुंबई

आखणी: संतोष जाधव,त्रिमूर्ती आर्ट्स, लोअर परेल सजावट: श्रवण घोडके, एकता पेडणेकर, विक्रम-निकिता जाधव, सागर दळवी, निखिल सावंत, साहिल साटम, ऋषिकेश कदम, सेजल शेट्ये, दिक्षा घोले, पार्थ गांगण, धीरज यादव, अंकिता जाधव प्रकाशव्यवस्था: तेजस पाटील छायाचित्र व चित्रफीत: स्वप्निल जाधव कलादिग्दर्शन व संकल्पना: रोहन सावंत

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
बाकीचे डेकोरेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *