महादेव गंगाधर सोन्नर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT विभागाच्या प्रदेशमहासचिव पदी निवड करण्यात आली व ही निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांतध्यक्ष आदरणीय मा नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.पल्लवीताई रेणके यांनी केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. ही निवड म्हणजे या आधी केलेल्या काम आणि गोरगरीब, कष्टकारी वर्गासाठी केलेले काम लक्षात घेऊन मला ही जबाबदारी देऊन या पुढे ही त्याच जोमाने मला काम करण्याची संधी दिली आणि ही संधी मी सार्थ करून दाखले व
काँग्रेस पक्षात काम करत असताना आदरणीय मा नानाभाऊ पटोले व पल्लवीताई रेणके आपण माझ्यावरती जो विश्वास दाखवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाच्या “प्रदेश महासचिव “ पदाची जबाबदारी मला दिलेली आहे त्या पदाला न्याय देऊन विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील अडचणी सोडवण्याचे व काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करेन आणि आपण जी जबाबदारी मला देऊन काम करण्याची संधी दिलात त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद .


संघटनेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय तरुणांची संघटन करत त्यांना नोकरी ,रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे तसेच शिक्षित तरुणांना उद्योजक बनविणे यासाठी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती, प्रचार करून जातीयवादी विचारधारेच्या मनुवादी भाजपा सरकारला त्यांची जागा दाखवून केंद्र व राज्यात पुन्हा पुरोगामी विचारांचे काँग्रेस सरकार आणण्याचा संकल्प केला आहे असे सोन्नर यांनी म्हटले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.