१५ लाखा पर्यनत ची कामे ग्रामपचायतीला घेता येणार नाही ह्या बाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून योग्य तो न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय सरपंच यांच्या हक्कासाठी, आज महाड तालूक्याचे कार्यसम्राट आमदार, पक्ष प्रतोद शिवसेना विधीमंडळ, शिवसेना उपनेते, ना. मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना त्यांचे महाड येथील निवासस्थानी भेट घेऊन सर्व सरपंच यांचे वतीने निवेदन दिले. त्यावर साहेबांनी तत्पर कार्यवाही करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेशी फोनवर चर्चा करून अर्जंट मंगळवार दि. 30/07/2024 रोजी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी बोलावले आहे. तसेच पुढील चर्चेनुसार पुणे जिल्ह्यातील सन्माननीय सरपंच यांचेशी चर्चा करणेसाठी वेळ देणार आहेत.



सदर निवेदन देण्यासाठी भारतीय सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री विकास शिवाजीराव कडूपाटील (सरपंच निवी गेव्हंडे), वेल्हे तालूका सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष मा. श्री सागर चोरघे, मावळ तालुक्यातील कार्यसम्राट सरपंच मा. श्री गणेश भोराडे, कुरंगवडी गावचे कार्यक्षम सरपंच मा. श्री अनिल ननावरे, श्री अमोल भाऊसाहेब लिमण (सरपंच ग्रा.पं. पारवडी, अध्यक्ष भोर तालूका सरपंच सेवा महासंघ) उपस्थित होते.