चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळावरून 200 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता भूस्खलन झाले आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरूच
अपघाताचा परिसर झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहराचा आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. भूस्खलनात 18 घरे ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.
या भागातून मोठ्या प्रमाणात लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. हा चीनचा एक दुर्गम भाग आहे, जिथे मोठे पर्वत आहेत.