G Kishan Reddy on Hyderabad Rename:
तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर केले जाईल, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.
रेड्डी म्हणाले, “ज्या प्रकारे बॉम्बे, मद्रास, कलकत्ताची नावे बदलण्यात आली, त्याचप्रमाणे हैदराबादचेही भाग्यनगर केले जाईल. हा हैदर कोण होता? तुम्ही कुठून आलात? आम्हाला अशा व्यक्तींच्या नावांची गरज आहे का?
आम्ही सत्तेत आलो तर हैदराबादचे नाव नक्कीच बदलू.” “भाग्यनगर हे नाव तेजीत आहे,” रेड्डी म्हणाले.