देश - विदेश

आरोपींना अराजकता माजवायची होती, विदेशी फंडिगचंही कनेक्शन… ; संसद घुसखोरी प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

संसदेत घुसखोरी केल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संसदेत घुसखोरी केल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेमागे ललित झा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात असून त्यांना सरकारकडून त्यांच्या मागण्या पूर्ण करवून घ्यायच्या होत्या, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केलेल्या रिमांड याचिकेत केली आहे.

त्याचबरोबर त्यांना देशात अराजकता माजवायची होती. या घटनेमागील आरोपींचा खरा हेतू आणि त्यांचे शत्रू देशासोबत तसेच दहशतवादी संघटनांशी संबंधाच्या अँगलचाही तपास पोलिस करत आहेत.

ललित झा याला पटियाला हाऊस कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नियोजित हल्ल्यामागील मोठा कट उलगडण्यासाठी सखोल आणि सविस्तर चौकशीची गरज असल्याचे देखील म्हटले आहे.

न्यायालयात युक्तिवाद करताना, ललित झा मास्टरमाइंड आहे, त्यामुळे त्याच्या कोठडीची गरज आहे. या कटामागे किती लोकांचा हात होता, याचा शोध घ्यावा लागेल. पुरावे गोळा करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये जावे लागते, असेही दिल्ली पोलिसांनी सांगितले. कटात वापरलेला मोबाइलही जप्त करण्यात येणार आहे.

दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात सांगितले की, संसदेच्या सुरक्षेत झालेल्या घुसखोरीचा मास्टरमाइंड ललित झा याने खुलासा केला की त्यांना देशात अराजकता माजवायची होती. जेणेकरून ते सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडू शकतील. पोलिसांच्या चौकशीत ललितने या प्रकरणात आपला सहभाग असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड कसा बनला हेही त्याने सांगितले.

दोन आरोपींनी गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारल्याच्या 13 डिसेंबरच्या घटनेचे री-क्रिएट करण्यासाठी दिल्ली पोलिस संसदेची परवानगी घेण्याची शक्यता आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी आरोपींची नावे असल्याचे समोर आले आहे.

ललीत झा याने चौकशीदरम्यान खुलासा केला आहे की त्याने स्वतःचा फोन दिल्ली जयपूर बॉर्डरजवळ फेकून दिला होता आणि इतर आरोपींनी देखील फोन देखील नष्ट करण्यात आले आहेत.

विदेश फंडिंगचं कनेक्शनही तपासणार

या घटनेपूर्वी आरोपी अनेकदा दिल्लीला आले होते. येथे त्यांनी परिसराची रेकी केली होती. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात विदेशी फंडिग असल्याची शंका आहे. पोलीस या अँगलने देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ळलित झा ने चौकशीत आरोपींनी संसदेत घुसखोरी करण्याचा कट रचण्यासाठी आपण अनेकदा भेटल्याचे कबुल केले आहे. पोलिसींनी कोर्टात सांगितले की शत्रू राष्ट्रासोबत किंवा दहशतवादी संघटनेसोबत संबंध आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी अधिक चौकशीची आवश्यकता आहे.

या घटनेनंतर ललित झा याने सर्व आरोपींचे फोन देखील घेतले होते. जेणेकरून त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे नष्ट करता येतील. ललितने खुलासा केला की त्याने त्याचा फोन जयपूरहून दिल्लीला जाताना वाटेत फेकून दिला होता. पोलीस ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ललितला राजस्थानला घेऊन जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *