यमुना तिरी आदित्य ठाकरेंकडून महाआरती
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मथुऱेचाही त्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी यमुना तिरी महाआरती देखील केली. यावेळी रश्मी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या.
राजधानी नवी दिल्लीतून आदित्य ठाकरे थोड्याच वेळात मथुरेकडे रवाना होणार आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने मथुरा येथील ठाकुर श्यामजी महाराज या प्राचीन मंदिराच्या सुशोभिकरण व नूतनीकरणाचे उद्धाटन करण्यात येणार आहे.
आदित्य ठाकरे यांचा मथुरा दौरा –
सकाळी 11.30 वाजता – बांके बिहारी मंदिर वृंदावन येथे दर्शन
दुपारी 12.00- तटीया स्थान, वृंदावन दर्शन
दुपारी 12.30- 1.30 वाजता – दुपारी वृंदावन जेवण
दुपारी 2 वाजता – मथुरे कडे रवाना होणार
दुपारी 2 ते 3 वाजता – यमुना पूजा
दुपारी 3.15 वाजता – ठाकूर श्यामजी मंदिराच उद्घाटन
दुपारी 4 वाजता – द्वारकाधीश दर्शन
दुपारी 4.30 वाजता- कृष्णजन्मभूमी दर्शन
संध्याकाळी ५ वाजता – दिल्लीकडे रवाना