देश - विदेश

बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षाकडून स्वामी विवेकानंदांचा अपमान? तृणमूल आक्रमक, नेत्याकडून सारवासारव

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे.

नवी दिल्ली- पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. असे असले तरी मुजूमदार यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. (BJP West Bengal president Sukanta Majumdar insult swami vivekanand on football and Gita said tmc)

मुजूमदार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते म्हणताना दिसताहेत की, बंगाल हे भक्ती चळवळीचे उगमस्थान राहिले आहे. बंगालमध्ये सनातन धर्म गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. पण, काही काळ डाव्या लोकांमुळे बंगाल भटकला होता. जे लोक गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळाला उच्च स्थान देतात ते सर्व डाव्या विचारसरणीचे प्रोडक्ट आहेत. पण, बंगाल आता योग्य मार्गावर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *