Australia vs Pakistan Test : पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ACC) सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे.
मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्याव्यतिरिक्त, ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मधून दोन गुण देखील कापले आहेत. पर्थमध्ये पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
पहिली कसोटी गमावल्यानंतर पाकिस्तानची WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली होती. पेनल्टीमुळे पाकिस्तानचे पॉइंट्स आता 66.67 वरून 61.11 झाले आहेत. भारत 66.67 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, दिलेल्या वेळेच्या पुढे प्रत्येक षटकासाठी 5 टक्के दंड आकारला जाईल. त्याच वेळी, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप प्लेइंग कंडिशनच्या कलम 16.11.2 नुसार, प्रत्येक षटक कमी टाकल्याबद्दल संघाला एक गुण दंड आकारला आहे.
पाकिस्तानने निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकल्याने एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने ही शिक्षा स्वीकारली. मसूदची कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळला जाईल, जो कसोटी बॉक्सिंग डे आहे.