Covid 19 NZ vs PAK : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका होणार असून आज (दि. 12) मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे होणार आहे. मात्र त्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे.
संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टी 20 सामन्याला मुकणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सँटनरला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट करून सांगितले. ‘मिचेल सँटनर हा एडन पार्कवर होणाऱ्या पहिल्या टी 20 सामन्यासाठी रवाना होणार नाहीये. पाकिस्तान सोबतच्या पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी सँटनरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल. तो एकटा त्याच्या घरी हॅमल्टनसाठी रवाना झाला आहे.’
मिचेल सँटनर हा न्यूझीलंडच्या टी 20 संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याने 64 डावात 16.94 च्या सरासरीने 610 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 93 सामन्यात 105 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ :
डेवॉन कॉन्वे, फिन एलन, केन विलियम्सन, मार्क कॅम्पमन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, टीम सैफर्ट, मिचेल सँटनर, टीम साऊदी, इश सोदी, मॅट हेन्री, अॅडम मिलने, बेन सेआर्स.