आयपीएल 2024 स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे.या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला सोडले आहे. तसेच तो आता मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आगामी मोसमात तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
