India vs England 1st Test Day 2
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. भारताने दुसऱ्या दिवसाचे तीनही सत्र खेळून काढत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात आतापर्यंत 175 धावांची आघाडी मिळवली आहे.
भारताकडून केएल राहुल (86), रविंद्र जडेजा (नाबाद 81) आणि यशस्वी जयस्वाल (80) यांनी दमदार फलंदाजी केली. त्यांना श्रीकार भारतने 41 तर अय्यर आणि अक्षरने 35 धावा करत चांगली साथ दिली.
दिवसअखेर भारताकडे 175 धावांची आघाडी
भारताने दुसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या डावात 7 बाद 421 धावांपर्यंत मजल मारली. रविंद्र जडेजा 81 तर अक्षर पटेल 35 धावा करून नाबाद आहे. भारताकडे पहिल्या डावात 175 धावांची आघाडी आहे.
IND vs ENG : भारताची भक्कम आघाडी
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने दमदार अर्धशतक ठोकत भारताला पहिल्या डावात 140 धावांची आघाडी मिळवून दिली. अश्विन स्वस्तात माघारी गेल्यानंतर जडेजाने अक्षर पटेलसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली आहे.
KS Bharat : भरतचे अर्धशतक हुकले
केएस भरत आणि रविंंद्र जडेजाने सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मात्र जो रूटचा एक चेंडू खाली राहिला अन् केएस भरत स्विप मारण्याच्या नादात 41 धावांवर बाद झाला.
IND vs ENG : भारताची आघाडी शतक पार
रविंद्र जडेजा आणि केसी भरत यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 61 धावांची भागीदारी रचली. याचबरोबर भारताने पहिल्या डावात 100 धावांची आघाडी घेतली.
रविंद्र जडेजाची अर्धशतकी तलवारबाजी
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने पहिल्या कसोटीत अर्धशतकी खेळी करत भारताची आघाडी मजबूत केली. जडेजाने 84 चेंडूत अर्धशतक ठोकत भारताला 336 धावांपर्यंत पोहचवले. जडेजाचे हे 20 वे कसोटी अर्धशतक आहे.
IND vs ENG 1st Test Day 2 Live : भारताकडे 54 धावांची आघाडी
भारताने पहिल्या डावात 54 धावांची आघाडी घेतली आहे. केएल बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि केसी भरत यांनी भारताला 300 धावांपर्यंत पोहचवले आहे.
IND vs ENG 1st Test Day 2 Live : केएलचं शतक हुकलं
केएल राहुलचे शतक हुकले. टॉम हार्टलीला षटकार मारण्याच्या नादात केएल राहुल झेलबाद झाला. त्याने 123 चेंडूत 86 धावा केल्या आहेत. त्याने जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली.
KL Rahul : केएल राहुलने गिअर बदलला
केएल राहुलने श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर गिअर बदलला. त्याने आक्रमक फटकेबाजी करत भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यास सुरूवात केली. भारताने 57 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 250 धावांचा टप्पा गाठला आहे. केएल राहुल 79 धावांवर नाबाद आहे.
Shreyas Iyer : षटकार मारण्याचा मोह अय्यरला पडला महागात
उपहारापर्यंत अर्धशतकी भागीदारी रचणारी केएल राहुल आणि श्रेयस अय्यरची जोडी उपहारानंतर दुसऱ्याच षटकात फुटली. रेहान अहमदच्या गुगलीवर षटकार मारण्याचा मोह अय्यरला महागात पडला. तो 35 धावा करून बाद झाला.
IND vs ENG 1st Test : उपहारासाठी खेळ थांबला
भारताने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 50 षटकात 3 बाद 222 धावांपर्यंत मजल मारली. खेळ थांबला त्यावेळी केएल राहुल 55 तर श्रेयस अय्यर 34 धावा करून नाबाद होते.
दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र
- षटके – 27
- धावा – 103
- विकेट्स – 2
KL Rahul : केएल राहुलचे दमदार अर्धशतक
केएल राहुलने अर्धशतक ठोकत श्रेयस अय्यर सोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
IND vs ENG 1st Test Day 2 Live : राहुल अर्धशतकाच्या जवळ
भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या आहेत. केएल राहुल 42 आणि श्रेयस अय्यर 4 धावांसह खेळत आहेत. राहुल त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 14व्या अर्धशतकापासून आठ धावा दूर आहे. भारत अजूनही इंग्लंडच्या धावसंख्येपेक्षा 67 धावांनी मागे आहे. टीम इंडिया मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. आज टीम इंडियाला यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलच्या रूपाने दोन धक्के बसले.
IND vs ENG 1st Test Day 2 Live : शुभमन गिल तंबूत! टीम इंडियाला तिसरा झटका; जैस्वालचे शतक हुकले
भारताला 159 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने शुभमन गिलला झेलबाद केले. शुभमनने 66 चेंडूत 23 धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. याआधी टीम इंडियाला यशस्वीच्या रूपाने दिवसाचा पहिला धक्का बसला होता. त्याला 80 धावा करता आल्या.
IND vs ENG 1st Test Day 2 Live : भारताची धावसंख्या 150 धावांच्या पार; यशस्वी जैस्वालचे शतक हुकले!
भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 157 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकापासून इंग्लंडने फिरकी गोलंदाजापासुन सुरूवात केली. जो रूट एका टोकाकडून तर टॉम हार्टली दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करत आहे.
दिवसाच्या पहिल्याच षटकात जो रूटने यशस्वी जैस्वालला बाद केले होते. त्याला 80 धावा करता आल्या. केएल राहुल आणि शुभमन गिल इंग्लंडच्या फिरकी आक्रमणाचा सामना करत आहेत.
IND vs ENG 1st Test Day 2 Live : यशस्वी जैस्वालचे शतक हुकले! दिवसाच्या पहिल्याच षटकात रूटने दिला टीम इंडियाला मोठा झटका
दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक टाकण्यासाठी जो रूट आला. आणि पहिल्याच षटकात विकेट घेतली. रुटने यशस्वीला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. यशस्वीचे शतक हुकले. तो 74 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 80 धावा करून बाद झाला. भारताची धावसंख्या सध्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 124 धावा आहे.
सध्या शुभमन गिल आणि केएल राहुल क्रीजवर आहेत.