पीडित चिमुरडी ही पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी असून ती तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आजीसोबत राहते.
आजीसोबत बाजारात सामान घेण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या चिमुरडीने मुलीने शेजारच्या तरुणाला पाहताच जोरजोरात किंचाळायला सुरुवात केली. घाबरलेल्या आजीने विचारले असता तिने सांगितले की या काकांनी तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केलं आहे. तरुणाही त्या मुलीला पाहताचपळू लागला. तेव्हा ती मुलगी जोरात ओरडली… त्याला धरा, जाऊ देऊ नका. मात्र तो फरार झाला.
यानंतर आजीने पोलिस स्टेशन गाठलं आणि गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी ढाब्यावर काम करणाऱ्या लवकुश (२२) याला पकडले. लवकुशने गुन्ह्याची कबुली दिली आहे.उत्तर प्रदेशातील एका शहरात ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आजीसोबत राहते. 17 डिसेंबर रोजी ती प्रसाद घेण्यासाठी शेजारी गेली होती. तेथे लवकुशने तिला आमिष दाखवून सोबत नेले. 300 मीटर अंतरावर एका पडक्या इमारतीत तिच्यावर आत्याचार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. भीतीपोटी मुलीने घरी काहीही सांगितले नाही. वेदनाही सहन केल्या. रविवारी बाजारात लवकुश याला पाहिल्यावर मात्र ती गप्प बसली नाही.
लवकुश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी ती त्याच्या घरी गेली होती, असे मुलीच्या आजीने सांगितले. बलात्काराबाबत विचारले असता त्याने हात जोडून कान पकडून माफी मागितली. आजीने पुढे सांगितले की, जेव्हा तिने त्याचा हात धरला आणि त्याला पोलिस स्टेशनला सोबत येण्यास सांगितले तेव्हा तो हात झटकून पळून गेला. अखेर सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली.
मुलीने महिला इन्स्पेक्टरला देखील आरोपीला चांगला चोप देऊन तुरुंगात टाका आणि तो कधीही बाहेर येऊ नये अशी विनंती देखील केली.