पोलीस समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक खळबळ जनक आणि तितकीच धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे.
या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या संबंधातून या महिला शिपायी गर्भवती राहिल्याने त्यांना जबरदस्तीने गर्भपात देखील करायला भाग पडण्यात आलं. यासबोतच या अधिकाऱ्यांनी शरिरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रार अर्जात केला आहे.