क्राइम

Mumbai Crime: 18 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

Crime: १ नोव्हेंबरला तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. तिला बेवसीरिजच्या ऑडिशनसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बोलावण्यात आले. २ नोव्‍हेंबरला ती तेथे गेली होती.

Nalasopara: सिनेमा, मालिकेत कामाचे प्रलोभन दाखवून ऑडिशनच्या नावाखाली १८ वर्षीय तरुणीचे अश्‍लील फोटो, व्‍हिडीओ बनवून ते वेबसाईटवर व्‍हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

याप्रकरणी तीन जणांविरुद्ध अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तो विरार गुन्हे शाखा कक्ष ३ कडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असून त्यांनी अशा अनेक तरुणीची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पीडित तरुणी ही वसईत भाड्याने राहते. त्यासाठी ती हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम मिळवण्यासाठी निर्मिती कंपन्यांकडे भेटी देत होती. दरम्यान, १ नोव्हेंबरला तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. तिला बेवसीरिजच्या ऑडिशनसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बोलावण्यात आले. २ नोव्‍हेंबरला ती तेथे गेली होती.

तेथे असलेल्या चार जणांनी आपण दिग्दर्शक, कॅमेरामन, अभिनेता आणि महिला मेकअप आर्टिस्ट असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला एका लॉजमध्ये नेले. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायचे सांगून तिचा अश्‍लील व्‍हिडीओ तयार केला.

याचा कुठेही वापर करणार नसल्याचे तिला सांगण्यात आले होते. मात्र, हे व्‍हिडीओ वेबसाईटवर व्‍हायरल करण्यात आले. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून समजताच तिने संबंधितांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद होते. अखेर तिने एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *