या प्रकरणी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याचा रागातून ४६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. पंकज मंडल असे या मृत तरुणाचे नाव आहे.
बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी घनश्याम खाकरोडिया या लसून विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान दुकानदाराने दुकानातून लसूण चोरल्याबद्दल पंकज मंडल याला बेदम मारहाण केली. भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.