नांदेड : शहरातील कलामंदिर परिसरात मीलगेट रस्त्यावर एका मटका व ऑनलाइन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून तब्बल २८ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नांदेड शहर उपविभागाच्या नूतन सहाय्यक पोलिस अधीक्षक सी. एम. किरतीका यांनी ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कलामंदिर परिसरातील अॅक्सीस बँकेच्या पाठीमागे संतोष अहीर व गोकुळ अहीर यांच्या घरी बंदीस्त ठिकाणी मटका अड्डा व ऑनलाइन लॉटरी सेंटरवर सहायक पोलिस अधीक्षक किरतीका सी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश डाकेवाड यांच्यासह पथकाने पंचासह बंदीस्त खोलीत छापा टाकला.
या वेळी त्यांची झडती घेतली असता पाच हजार रुपये किंमतीच्या तीन तलवारी व एक खंजर मिळाला. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.