क्राइम

Nashik News: नववीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने शाळेत कबड्डीचे सामने असल्याने घरीच होती. परंतु दुपारी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मीना ज्ञानेश्वर पवार (वय १४, रा. साती आसरा कॉलनी, पाझर तलावाजवळ, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत मुलीचे नाव आहे. मीना ही इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. कबड्डीचे सामने असल्याने ती शनिवारी (ता. २३) शाळेत गेली नाही.

दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ती घरात असताना झोपायला गेली. मात्र त्याचदरम्यान, तिने मधल्या रुममध्ये ओढणीने गळफास घेऊन जीवन संपविले. घटना लक्षात येताच तिला काका रमेश पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. गंगापूर पोलिस ठाण्याचे हवालदार डी. डी. सरनाईक यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मीना ही आजी व बाबांच्या घरी वास्तव्यास होती. तिचे आई-वडील हे आजीच्या घरासमोरच राहायला आहेत. मीनाचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *