आराध्या बच्चनचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
Aishwarya Rai Bachchan Doughter Aaradhya Bachchan Video: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारंभ सोहळा नुकताच झाला. यावेळी बऱ्याच स्टारकिड्सने स्टेजवर परफॉर्म केले. सध्या सोशल मिडियावर स्टारकिड्सचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
यातच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
ज्यात आराध्याने अभिनय केला आहे. यावेळी आराध्या वेगळ्या लूकमध्ये दिसली. आराध्या स्टेजवर बदललेल्या हेयर स्टाईलसह मेकअपमध्ये दिसली.
यादरम्यान तिचा लुक पूर्णपणे बदललेला दिसत आहे. स्टेजवर इंग्रजीत अभिनय करणाऱ्या आराध्याने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अशा परिस्थितीत तिला ओळखणेही कठीण झाले होते.
आराध्याचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर तिने केलेल्या अभिनयाचे सर्वच नेटकरी कौतुक करत आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदा ऐश्वर्यांच्या लेकीचा पुर्ण चेहरा दिसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
आराध्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एकानं लिहिले की, “शेवटी आम्हाला आराध्याचा चेहरा पाहायला मिळाला.” तर दुसर्याने लिहिले, “आराध्याची हेअरस्टाइल करणाऱ्याला एक पुरस्कार द्या”
शाळेच्या वार्षिक दिनानिमित्त आराध्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व बच्चन कुटुंब एकत्र आले. यावेळी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन एकत्र स्पॉट झाले होते. ऐश्वर्या रायने तिच्या लेकीचा परफॉर्म मोबाईलमध्ये शुट केला.