मनोरंजन

Censor Board New CEO: रविंद्र भाटकरांवरील कारवाईनंतर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बदलले; स्मिता वत्स यांच्याकडे जबाबदारी

लाचखोरी प्रकरणात रविंद्र भाटकरांची हकालपट्टी झाली असुन नव्या अध्यक्षांकडे जबाबदारी सोपवण्यात आलीय

Censor Board New CEO Smita Vats Sharma News: गेल्या काही दिवसांपासुन सेन्सॉर बोर्डाचा वाद चांगलाच गाजतोय. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ रवींद्र भाटकर यांच्यावर अभिनेता विशालने लाचखोरीचा गंभीर आरोप लावला होता.

आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. स्मिता वत्स शर्मा यांची यांची सेन्सॉर बोर्डाच्या नवीन सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त जाणून घ्या.

(Censor Board New CEO Smita Vats Sharma Big action against Censor Board’s former CEO Ravindra Bhatkar)

माजी सीईओ रविंद्र भाटकरांवर झाली ही कारवाई

स्मिता वत्स शर्मा या सेन्सॉर बोर्डाच्या नवीन सीईओ झाल्याचा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेने जारी करण्यात आला आहे. कालपर्यंत सीईओ असलेले रवींद्र भाटकर आता या पदावर नाहीत. त्यांना कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले.

भटकर यांची पुन्हा रेल्वे मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. रवींद्र यांच्या बदलीचे कारण अद्याप समजलेले नाही. याशिवाय रविंद्र यांनी राजीनामा दिला की त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तामिळ अभिनेता विशालने केलेले गंभीर आरोप

काही दिवसांपुर्वी सेन्सॉर बोर्डावर लाचखोरीचा आरोप झाला होता. तमिळ अभिनेता विशालने हा आरोप केला होता. चित्रपट पास करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना 6.5 लाख रुपये द्यावे लागले असं त्याने आरोपात सांगितलं होतं.

इतकंच नाही तर हे आरोप करत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत कारवाई करण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर, या प्रकरणी गुन्हा नोंदवून CBI ने CBFC चे काही अधिकारी आणि इतर तिघांविरुद्ध तपास सुरू केला होता. आता रवींद्र भाटकर यांच्यावर झालेली कारवाई याच प्रकरणी असू शकते असा अंदाज लावला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *