Maharashtra Shahir News: २०२३ मध्ये अनेक मराठी सिनेमे गाजले. या सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ‘महाराष्ट्र शाहीर’ आता टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या तारखेपासून टीव्हीवर
‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा आता टीव्हीवर घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळणार आहे. १८ फेब्रुवारीला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना टीव्हीवर बघण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट काही महिन्यांपुर्वी ओटीटीवर रिलीज झाला. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा 2 जून 2023 ला एमेझॉन प्राइम या ओटीटी साईट वर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी ही ओटीटी शिवाय टीव्हीवर हा सिनेमा पाहण्याची पर्वणी असणार आहे.
गेल्या अनेक वर्षांमध्ये अंकुश चौधरीने ‘महाराष्ट्र शाहीर’ हा केलेला पहिला बायोपिक आहे. अंकुशची प्रमुख भूमिका असलेला आणि केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.
या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदेने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते या अभिनेत्रींनी सिनेमात विशेष भूमिका साकारल्या. सिनेमातील ‘बहरला हा बधुमास’ हे गाणं चांगलंच गाजलं.