मनोरंजन

Meghna Gulzar On Deepika Padukone: ‘दीपिकाच्या JNU वादामुळेच…’ चार वर्षानंतर दिग्दर्शिका मेघनानं व्यक्त केली मनातील खदखद

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit: प्रसिद्ध फिल्ममेकर मेघना गुलजार तिच्या हिट चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. मेघना सध्या तिच्या आगामी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 1 डिसेंबरला मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

विकी कौशल आणि दिग्दर्शक मेघना गुलजार सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच मेघना गुलजारने ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ कार्यक्रमात तिच्या ‘छपाक’ चित्रपटाबद्दल खंत व्यक्त केली आहे.

दीपिका पदुकोण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्यानंतर तिने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या JNU वादाचा परिणाम तिच्या ‘छपाक’ चित्रपटावर झाल्याचे मेघनाने मान्य केले आहे.

यावर बोलताना मेघना गुलजार म्हणाली, ‘मला खात्री आहे आणि माझे उत्तर अगदी स्पष्ट आहे. अर्थात दीपिकाच्या कथेचा चित्रपटावर परिणाम झाला. कारण हा चित्रपट अॅसिड हल्ल्याबाबत होता आणि जेएनयू हा वेगळा मुद्दा होता. पण हा मुद्दा अॅसिड हल्ल्यापासून वादाच्या हिंसेपर्यंत गेला. वाद खूप वाढले आणि या सर्व वादांचा चित्रपटावर परिणाम झाला यात शंका नाही.’

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 2020 च्या JNU हल्ला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात निदर्शने करण्यात आली. दीपिका पदुकोणने तिचा ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधी जेएनयूला भेट दिली होती.

तेथे गेल्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले. दीपिका आणि तिच्या ‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. #BoycottChhapaak आणि #BlockDeepika सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होते.

2020 मध्ये, दीपिका पदुकोण आणि विक्रांत मॅसी अभिनीत छपाक चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित होता. दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लक्ष्मीची भूमिका साकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *