Radhika Apte News: मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिका आपटेचा विशेष भूमिका असलेला मेरी ख्रिसमस सिनेमा रिलीज झालाय.
अशातच राधिका आपटेबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय. राधिका आपटे गेले काही तास एअरपोर्टवर अडकली आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या.
राधिकाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ – फोटो शेअर केलेत. त्याखाली राधिकाने कॅप्शनमध्ये लिहीलंय, “मला हे पोस्ट करावं लागंतय! आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती. आता 10:50 वाजले आहेत. आणि फ्लाइट अजूनही आलेली नाही. पण आम्हाला सांगण्यात आलंय की, आम्ही बोर्डिंग करत आहोत आणि सर्व प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवले आणि लॉक केले!”
राधिका पुढे लिहीते, “लहान मुलं, वृद्ध महिलांसह प्रवाश्यांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय. सेफ्टी दरवाजे उघडणार नाही, असं सांगण्यात आलंय. आणि या गोष्टीचा कर्मचार्यांना अजिबात कल्पना नाही! क्रूच्या शिफ्टमध्ये बदल झाला असून ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत परंतु नवीन क्रू कधी येतील याची त्यांना कल्पना नाही. याशिवाय आम्हाला किती वेळ आत लॉक केले जाईल हेही कोणाला माहिती नाही.”
राधिका शेवटी सांगते, “बाहेरच्या अत्यंत मूर्ख कर्मचारी महिलांशी बोलणं मी सोडून दिलंय. त्यांना काहीही माहित नाही. काही अडचण नाहीये आणि फ्लाईट वेळेत आहे, असं त्या म्हणत आहेत. आता मी आतमध्ये लॉक आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही रात्री १२ वाजेपर्यंत येथे असू.. सर्व लॉकइन आहेत. पाणी नाही, बाथरुमची सोय नाही. या मजेदार प्रवासाबद्दल धन्यवाद!!”
अशी पोस्ट राधिकाने केलीय. राधिकाच्या या पोस्टखाली अनेकजण कमेंट करत मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय.