मनोरंजन

Shruti Haasan: गुपचूप लग्न केलं? अखेर श्रृती हसनने चाहत्यांना खरं सांगितलं! पोस्ट व्हायरल

Shruti Haasan Reacts Marriage Rumours:  दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन ही नुकतीच प्रभासच्या सालार चित्रपटात दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र आता श्रुती हासन तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

श्रुती हासनने तिचा प्रियकर शंतनु हजारिकासोबत गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे., अलीकडेच बॉलीवूड सेलिब्रिटी ओरीने श्रुतीबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती, ज्यात त्याने तिच्या प्रियकराला तिचा नवरा म्हटले होते. या बातम्या सोशल मिडियावर इतक्या व्हायरल झाल्या की अखेर श्रुती हासनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

लग्नाच्या बातमीवर श्रुती हसनने पोस्ट करत लिहिले. तिने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले – ‘माझे लग्न झालेले नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल इतकी स्पष्ट सांगणारा व्यक्ती, मी ते का लपवेल? म्हणून जे मला अजिबात ओळखत नाहीत. त्यांनी कृपया शांत बसा.

श्रुतीच नाही तर तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिका यानेही इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करून आपल्या लग्नाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. पोस्ट शेअर करत शंतनू हजारिका यांनी लिहिले की, “तुम्ही जरा शांत व्हा! आमचे लग्न झालेले नाही. जे आम्हाला ओळखत नाहीत त्यांनी कृपया अफवा पसरवणं थांबवा.”

ओरी ने अलीकडेच रेडिट वर ‘आस्क मी एनीथिंग’ सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये चाहत्यांनी विचारले असता, त्याने सांगितले की श्रुती हासनने त्याच्यासोबत असभ्य वर्तन केलं होते.

ओरीने सांगितले, “फोटोसाठी पोज देण्यासाठी नाही, पण एका इव्हेंटमध्ये जिथे मी तिला भेटलो, तेव्हा ती माझ्यासोबत खूप उद्धट वागली होती.

त्यावेळी मी तिला ओळखत नव्हतो त्यामुळे कदाचित गैरसमज झाला असावा, कारण मी तिच्या पतीशी खूप चांगला वागलो होते आणि त्यांची प्रशंसाही केली होती.

या गोष्टी काही वेळानंतर चांगल्या होतील. पण मी अफवा ऐकल्या होत्या की त्यानी मला स्पॉट बॉय म्हणून बोलावले होते. यानंतर श्रुतीने गुपचूप लग्न केल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

श्रुतीचा प्रियकर शंतनू हजारिका डूडल कलाकार आहे. त्याने रफ्तार, दिव्य, ऋत्विज यांसारख्या म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. श्रुती आणि शंतनू 2018 पासून एकमेकांना ओळखतात आणि 2020 पासून ते लिव्ह इन मध्ये राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *