food

Christmas Plum Cake Recipe: यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी? मग टेस्टी प्लम केकची ही रेसिपी नक्की ट्राय करा

ख्रिसमससाठी टेस्टी प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

भारतीयांना उत्सव साजरा करण्यासाठी निमित्त हवे असते. ख्रिसमस असो किंवा नवीन वर्ष, पार्टी मोड आधीच सुरू असतो. त्याचप्रमाणे ख्रिसमसला केक बनवण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. ख्रिसमसला खास आणि चवदार बनवण्यासाठी बहुतेक लोक प्लम केक नक्कीच बनवतात.

प्लम केक हा एक उत्तम केक आहे, जो फळे आणि ड्राय फ्रूट्सने बनवला जातो. मात्र, हा केक बनवण्यासाठी प्लमचा वापर केला जात नाही. हा केक बनवण्यासाठी वाळलेल्या बेरी आणि मनुका वापरतात. हा केक बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला चविष्ट आहे. टेस्टी ख्रिसमस प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

ख्रिसमस प्लम केक बनवण्यासाठी साहित्य-

  • 1 कप बटर
  • 1 1/2 कप साखर
  • 6 अंडी
  • 125 ग्रॅम बदामाचे तुकडे
  • 2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • 2 1/2 मिक्स ड्राय फ्रुट
  • 2 कप मैदा
  • 8 इंच गोल केक टिन

ख्रिसमससाठी प्लम केक कसा बनवायचा-

ख्रिसमससाठी प्लम केक बनवण्यासाठी प्रथम फळे आणि बदाम 2 चमचे मैद्यामध्ये मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर बटर, साखर, अंडी आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र मिक्स करा. आता हे मिश्रण एका बेकिंग टिनमध्ये ठेवा आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 ते 40 मिनिटे बेक करा. तुमचा चविष्ट प्लम केक तयार आहे. केक थंड होण्यासाठी सोडा. त्यानंतर सर्व्ह करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *