Benefits of Zumba : सध्याच्या तरूण पिढीतील लोकांमध्ये ताण-तणाव, नैराश्य इत्यादी मानसिक आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानसिक आरोग्यासोबतच शारिरीक समस्यांमध्ये ही वाढ झाली आहे. बदललेली जीवनशैली, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे, आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आपल्याला निरोगी जीवनशैली आणि त्याला व्यायामाची जोड देणे महत्वाचे आहे. त्यासाठी, योगा, मेडिटेशन आणि व्यायाम यांचा समतोल साधला पाहिजे.
परंतु, अनेकांना व्यायाम करायला आवडत नाही, त्यांना व्यायाम करताना आनंद वाटत नाही. त्यामुळे, अशा लोकांसाठी झुंबा हा एक रोमांचकारी आणि उत्तम व्यायाम प्रकार आहे. आज आपण झुम्बाचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
कॅलरीज आणि फॅट बर्न्स होतात
झुम्बा व्यायाम प्रकार केल्याने शरीरातील वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तसेच, झुम्बा करताना आपले शरीर वेगाने हालचाल करते. त्यामुळे, स्नायूंमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
परिणामी फॅट्स आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न्स होतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी झुम्बा फायदेशीर आहे.
तणाव कमी होतो
नृत्याच्या स्वरूपात केला जाणारा व्यायाम प्रकार म्हणून झुम्बाकडे पाहिले जाते. अनेक महिलांची आजकाल पहिली पसंती ही झुम्बालाच असते.
शिवाय, झुम्बा केल्याने शरीराला आनंदी करणारे सेरोटोनिन हे हार्मोन स्त्रवण्यास सुरूवात होते, त्यामुळे, आपला मूड सुधारतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच, आपले मन प्रसन्न आणि आनंदी राहते.
रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका टळतो
झुम्बा व्यायाम प्रकारे केल्याने शरीराची वेगाने हालचाल होते. वेगाने हालचाल झाली की, शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. तसेच, रक्तवाहिन्यांचे काम सुधारते. त्यामुळे, रक्तदाब सारख्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका टळतो. त्यामुळे, आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी झुम्बा नियमितपणे करणे हे फायद्याचे ठरते.