तुम्ही एकाच बॉटलनी पाणी पिता तर सावधान!
बर्याच वेळा असं घडतं की आपण एकाच ग्लासातील किंवा बाटलीमधील पाणी अनेक वेळा पीत असतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्यातील पाणी अनेक वेळा प्यायल्याने शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. यामुळे अनेक आजार होतात.
अनेकदा लोक बाहेर जातात किंवा ऑफीसला जातात तेव्हा सोबत पाण्याची बॉटलसुद्धा घेऊन जातात. काही लोक घरीसुद्धा त्याच बॉटलनी पाणी पितात. अनेकदा लोक पाण्याच्या बॉटल रीयूज करतात.
आपण एकाच ग्लासातून किंवा बाटलीतून अनेक वेळा पाणी पितो हे बहुतेकजण मान्य करतील. आता याचे कारण केवळ आळशीपणा नसून माहितीचा अभाव देखील असू शकतो. होय, एकाच भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे अनेकांना माहीत नसेल.
एकाच ग्लासमधून पाणी अनेक वेळा प्यायल्यास अत्यंत संसर्गजन्य विषाणू काचेच्या वरच्या भागावर जमा होतात आणि या ग्लासातील पाणी प्यायल्याने हे संसर्गजन्य विषाणू पोटात जातात, त्यामुळे उलट्या आणि जुलाब सारखे आजार होऊ लागतात.
यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे पोटाच्या विकारासाठी हे अधिक धोकादायक असतं. आतड्यांचे आजारालाही हे बॅक्टेरीया निमंत्रण देतात.
यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टीक बॉटलनी पाणी पिणे सहजा टाळावे. कारण प्लास्टीक बॉटलनी पाणी पिणे शरीरासाठी आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी योग्य नसतं.