Health Care : निरोगी आरोग्य हवे असेल तर तुम्ही संतुलित आहार आणि व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. मात्र, सध्याचे धकाधकीचे जीवन आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
या समस्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलच्या समस्येचा ही समावेश आढळून येतो. आजकाल कॉलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. कोणती आहेत ही लक्षणे? चला तर मग जाणून घेऊयात.
त्वचेचा रंग बदलणे
आपल्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की त्याचा परिणाम हा रक्तप्रवाहावर होतो. त्यामुळे, याचा थेट परिणाम हा त्वचेच्या रंगावर होतो. शरीरातील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे शरीरातील पेशींना पुरेशा प्रमाणात पोषकद्रव्ये मिळण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, ऑक्सिजनची कमतरता भासते. हे घटक त्वचेच्या रंगांमध्ये बदल घडवून आणतात. त्यामुळे, त्वचेचा रंग बदलतो.
पायांमध्ये वेदना होणे
आपल्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल किंवा खराब कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. ही ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे पाय दुखू लागतात. पायांमध्ये तीव्र वेदना होण्यास सुरूवात होते.
शरीरातील हे वाढलेले कॉलेस्ट्रॉल पेरीफेरल आयटीएल डिसिझ (PAD) होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह मंद होतो. या सर्व कारणांमुळे पाय दुखू लागतात. शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यामागचे हे प्रमुख लक्षण आहे.
उच्च रक्तदाब
जर शरीरात खराब कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. बॅड कॉलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होते.
त्यामुळे, या स्थितीमध्ये छातीत दुखणे, डोके दुखणे, थकवा, आळस येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.