बिघडलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाडे कमजोर होऊ लागली आहेत.
Joint Pain : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे शरीर आणि मन दोन्ही थककेले असते. अशा परिस्थितीमध्य मग सांधेदुखी, पायाचे दुखणे आणि तळव्यांना सूज येऊ लागते. त्यामुळे, या सर्व समस्यांवर आराम मिळवण्यासाठी मग गोळ्यांची मदत घेतली जाते.
मात्र, सतत या समस्यांचा त्रास होत असेल तर यावर सतत गोळ्या देखील घेणे हे चांगले नाही. सतत गोळ्या घेतल्यामुळे, याचे कालांतराने आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, या समस्यांवर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
या उपायांमध्ये तीळाच्या तेलाचा समावेश आहे. तीळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही पायाच्या तळव्यांची मालिश केल्याने तुम्हाला या समस्यांपासून आराम मिळेल. या तेलाने मालिश करण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
रक्ताभिसरण सुधारते
रोज रात्री पायाच्या तळव्यांना तीळाच्या तेलाने मालिश केल्याने किंवा मसाज केल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. शरीराच्या प्रत्येक भागात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. तसेच, पायांना आराम देखील मिळतो. मधुमेह आणि हृदयाच्या रूग्णांसाठी देखील हे अतिशय फायदेशीर आहे.
सांधेदुखीपासून मिळतो आराम
तीळाचे तेल पायांना लावल्याने, पायांच्या तळव्यांना लावल्याने पायाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे, सांधेदुखीपासून आराम मिळण्यास फायदा होतो. तसेच, शरीरातील ताण-तणाव दूर होतो.
खरे तर तीळाच्या तेलात टायरोसिन सॉल्ट अॅमिनो अॅसिड असते, जे सेरोटोनिनचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे, खऱ्या अर्थाने तीळाचे तेल हे पायांसाठी आणि खास करून सांधेदुखीसाठी फायदेशीर आहे. या तेलाने नियमित मालिश केल्याने सांधेदुखीपासून तुम्हाला लवकर आराम मिळेल.
हाडांना मिळते मजबूती
तीळाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ब, व्हिटॅमिन ड, व्हिटॅमिन ई आणि फॉस्फरसचा समावेश आढळून येतो. शिवाय, या तेलामध्ये फॅट्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, सर्व पोषकतत्वांनी युक्त असलेले हे तेल शरीरासाठी फायदेशीर आहे.
तीळाच्या तेलाचा वापर करून तुम्ही सांध्यांची, पायांची, तळव्यांची मालिश करू शकता यासोबतच, डोकेदुखी आणि शरीराच्या इतर भागांतील वेदनांवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही तीळाच्या तेलाने मालिश करू शकता. आयुर्वेदामध्ये सांधेदुखी आणि मजबूत हाडांसाठी तीळाच्या तेलाची शिफारस आवर्जून केली जाते.