आरोग्य

Mediterranean Diet : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे मेडिटेरिनियन डाएट आहे तरी काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे

Mediterranean Diet : बिघडलेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व व्यक्तींमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

वजनवाढीची ही समस्या दूर करण्यासाठी मग अनेक जण विविध प्रकारचे उपाय करतात. या उपायांमध्ये डाएटवरही भर दिला जातो. आजकाल डाएटचे अनेक प्रकार पहायला मिळतात. या डाएटमध्ये मेडिटेरिनियन डाएटला सर्वाधिक फायदेशीर मानले जाते.

US News आणि World Report ने सलग ५ व्या वर्षी मेडिटेरेनियन डाएटची जगातील सर्वोत्तम डाएट म्हणून निवड केली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते हे डाएट अनेक गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करते. हे डाएट वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

आज आपण हे मेडिटेरेनियन डाएट काय आहे? आणि याचे फायदे कोणते आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मेडिटेरेनियन डाएट म्हणजे काय?

मेडिटेरेनियन डाएट हे एक प्रकारचे प्लॅंट बेस्ड डाएट आहे. या डाएटमध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, ऑलिव्ह ऑईल, सोयाबिन, औषधी वनस्पती आणि काही मसाल्यांचा समावेश होता.

यासोबतच या डाएटमध्ये आठवड्यातून कमीत कमी २ वेळा सीफूड आणि विविध प्रकारच्या माशांचा समावेश होतो. प्रोटिनसाठी या डाएटमध्ये लो फॅट पनीर, दही, सोया आणि अंडी यांचा मर्यादित प्रमाणात समावेश केला जातो.

मेडिटेरेनियन डाएटचे फायदे खालीलप्रमाणे

मधुमेहाचे प्रमाण करते कमी

काही रिपोर्टनुसार, मधुमेहाच्या रूग्णांसाठी मेडिटेरेनियन डाएट हे अतिशय प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मेडिटेरेनियन डाएट फॉलो केल्यास मधुमेहाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मेडिटेरेनियन डाएटमध्ये फायबर्स आणि प्रोटिन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे, फायबर्सने युक्त असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे, फार भूक देखील लागत नाही. प्रथिनांनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

हृदयरोगापासून बचाव करते

मेडिटेरेनियन डाएटमध्ये ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, ऑलिव्ह ऑईल, जीवनसत्वे आणि कर्बोदकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. हे सर्व घटक आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हा सकस आहार आपल्याला कॅन्सर, मधुमेह आणि हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *