आरोग्य

Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

थायरॉईड नियंत्रण टिप्स : बदललेली जीवनशैली आणि असंतुलित आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. थायरॉइड ही अशीच एक समस्या आहे जी महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.

संशोधनानुसार, गेल्या 10 वर्षांत जगभरात थायरॉईड रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. 30 वर्षांखालील महिला आणि तरुणींमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत आहे.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे ही समस्या वाढल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या शरीरात आढळणाऱ्या थायरॉईड ग्रंथींचे कार्य कमी झाल्यामुळे थायरॉईडची समस्या उद्भवते.

त्यामुळे अशा परिस्थितीत थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता. त्या टिप्स काय आहेत? चला तर मग जाणून घेऊया.

खोबरेल तेल
थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी आपण खोबरेल तेल वापरू शकतो. यासाठी कोमट दुधात 1-2 चमचे खोबरेल तेल मिसळून सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी प्या.

कोरफड
काही डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी कोरफडीचा गर फायदेशीर आहे. कोरफड तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय अष्टपैलू आहे.

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोरफडीचे सेवन करू शकता. कोरफड शरीरातील वात आणि कफ दोन्ही संतुलित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरात थायरॉईडची समस्या उद्भवत नाही.

धणे आणि जिरे
धणे आणि जिरे थायरॉईडच्या समस्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. धणे आणि जिरे एकत्र घेतल्याने आश्चर्यकारक फायदे होतात. या उपायासाठी धने आणि जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या. त्यामुळे थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

तुळस
तुळशीला विशेषत: औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदात तुळशीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तुळस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुळशीची मदत घेऊ शकता. यासाठी एक कप कोमट पाण्यात तुळशीची पाने उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. तसेच, तुम्ही रिकाम्या पोटीही तुळशीची पाने खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *