आरोग्य

Vitamins Deficiency : कोणत्याही गोष्टीवर फोकस करताना अडचणी येतात? मग,’या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण झाली की, अनेक समस्या सुरू होतात.

Vitamins Deficiency : अनेकदा काय होते की, आपल्याला एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा असेल किंवा एकाग्र व्हायचे असेल तर काही अडचणी येऊ लागतात. हे कदाचित सर्वांच्या बाबतीत घडत असेल. तुम्ही काही वाचायला बसले असाल, किंवा ऑफिसचे काही काम करत असाल तर अशावेळी तुमचे मन त्या गोष्टीत एकाग्र होत नाही.

त्या गोष्टींवर फोकस करताना आपल्याला अनेक समस्या येतात. अशावेळी मग आपली चिडचिड वाढते आणि काम देखील बिघडते. खरे तर यामागे काही व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते.

या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे लक्ष केंद्रित करण्यास किंवा फोकस करण्यास अडचण येऊ शकते. कोणते आहेत हे व्हिटॅमिन्स? चला तर मग जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन डी

आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी अतिशय फायदेशीर आहे. शरीराला आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या व्हिटॅमिन्समध्ये या व्हिटॅमीनचा समावेश आढळतो. सनशाईन व्हिटॅमिन म्हणून ही या व्हिटॅमिनला ओळखले जाते.

शरीरात व्हिटॅमीन डी ची कमतरता निर्माण झाली की, याचा सेरोटोनिनच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे, याचा आपल्या मूडवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लक्ष केंद्रित करण्यास(फोकस) अडचणी येतात.

व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात दही आणि अंड्यांचा समावेश करू शकता यासोबतच पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश घेतल्याने तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकेल.

व्हिटॅमिन सी

शरीराला आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या जीवनसत्वांमध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश आढळून येतो. व्हिटॅमिन सी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

या जीवनसत्वांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. या व्हिटॅमिनचे आपल्याला अनेक फायदे होतात.

तणावापासून मेंदूच्या पेशींचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी हे अतिशय महत्वपूर्ण आहे. त्वचेसाठी आणि केसांसाठी हे व्हिटॅमिन लाभदायी आहे. फोकस करण्यासाठी किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी व्हिटॅमिन सी हे फार आवश्यक आहे.

या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात, लिंबू, लिंबूवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी, शिमला मिरची आणि आवळा खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *