मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
मिथुन : कला क्षेत्रात सुसंधी आहे. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. येणी वसूल होतील.
तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज योग्य ठरतील.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
धनू : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.