राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 19 जानेवारी 2024

मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तूळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *