मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.
कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
धनु : वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.