राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 17 डिसेंबर 2023

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

कर्क : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनू : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : वेळ वाया जाण्याची शक्यता. व्यवसायातील निर्णय रखडण्याची शक्यता.

मीन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *