मेष : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
धनू : वाहने जपून चालवावीत. शत्रूपिडा नाही.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.