मेष : कोणालाही जामीन राहू नका. हितशत्रुंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : वादविवाद टाळावेत. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल.