राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (७ जानेवारी २०२४ ते १३ जानेवारी २०२४)

जुन्या गुंतवणुकीतून फायदा

मेष : सप्ताहारंभ भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ देईल. विशिष्ट वसुली होईल. काहींना अमावस्या गुरुकृपेची ठरेल. पुत्रोत्कर्ष अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना यशस्वी मुलाखतीमधून नोकरी देतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सरकारी माध्यमातून कामं करून देणारा.

ओळखीतून लाभ होईल

वृषभ : ता. ८ व ९ हे दिवस अतिशय नावीन्यपूर्ण अशी शुभ फळं देतील. सर्व प्रकारच्या गाठीभेटी कराच. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखींतून मोठे लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. १० व ११ या दिवसांत वेंधळेपणापासून काळजी घ्या. वाहनांपासून योग्य काळजी राखा.

परिस्थितीजन्य मोठा लाभ

मिथुन : सप्ताह बुद्धिवंतांना छानच. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित कराल. मृग नक्षत्रास मोठे परिस्थितीजन्य लाभ घडतील. पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय. आर्द्रा नक्षत्रास ता. ९ व १० हे दिवस भाजण्या-कापण्याचे. बाकी सप्ताह नोकरीत छानच. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतून परदेशगमन.

नोकरीत भाग्योदय होईल

कर्क : सप्ताहात अमावस्येजवळ वाद टाळा. बाकी ता. ८ ते १० हे दिवस शुभग्रहांच्या ताब्यातले. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ चा शुक्रवार वैयक्तिक मोठ्या उत्कर्षाचा. कलाकारांचे भाग्योदय. ओळखीतून विवाहस्थळे.

नोकरीत स्थिरता येईल

सिंह : अमावस्या घबाड योगाची! अर्थातच अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात शुभ ग्रहांची जबरदस्त कनेक्टिव्हिटी राहील. ता. ८ ते ११ हे दिवस नववर्षाचं एक छान बजेटच घोषित करतील. मघा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत स्थिरावतील. वास्तुयोग आहेत. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एक पर्वणीसारखा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय होईल.

वाहनांपासून काळजी घ्या

कन्या : ता. ८ ते १० हे दिवस शुभग्रहांच्या कनेक्टिव्हिटीतून अतिशय नावीन्यपूर्ण फळं देतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्तांतून लक्ष वेधून घेता घेईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना छान विवाहस्थळं येतील. ता. ११ जानेवारीच्या अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात रस्त्यावरील सिग्नल सांभाळा. पाकीट जपा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वाहन पीडा.

नवकल्पनांमधून लाभ होईल

तूळ : सप्ताहात शुभग्रहांचा वरदहस्त असलेली आपली एक रास राहील. ता. ८ ते १० हे दिवस नववर्षाचं एक बजेटच घोषित करतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्य आत्मिक शक्तीचा लाभ होईल. परदेशस्य तरुणांचे भाग्योदय. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नवकल्पनांतून लाभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या दैवी प्रचितीचीच.

व्यवसायातील चिंता संपतील

वृश्चिक : सप्ताहात शुभग्रहांची गुप्त रसद पुरवली जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना याचा चांगलाच अनुभव येईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार वाहतुकीत सांभाळा. बाकी ता. ११ व १२ हे दिवस नोकरी-व्यावसायिक चिंता घालवतील.

पर्यटन व सन्मानाचा योग

धनु : सप्ताहातील मंगळ, गुरू आणि हर्षल यांचे योग आपल्या कर्तृत्वाला चांगलाच उजाळा देतील. ता. १० ते १२ हे दिवस मोठी नावीन्यपूर्ण फळे देतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती एखादा नवस फेडतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना छान पर्यटनाचा योग. पुत्रपौत्रांचे मोठे भाग्योदय होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल.

कागदपत्रांची काळजी घ्या

मकर : आजचा रविवार सूर्योदयी जपण्याचा. धारदार उपकरणे जपा. बाकी सप्ताह श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांकडून गुप्त रसद पुरवणारा. अर्थातच श्रद्धावंतांना. ता. ८ व ९ हे दिवस उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक भाग्यबीजं पेरणारी ठरतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र संमिश्र फलदायी होईल. गाठीभेटी यशस्वी होतील मात्र कागदपत्रे जपा.

स्पर्धात्मक पातळीवर यश

कुंभ : सप्ताहातील ग्रहांचा ट्रॅक छानच राहील. अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात गुरुकृपा होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण हिवाळ्यातही उबदार फळे देईल. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल. ता. ८ ते १० हे दिवस पुत्रपौत्रांच्या सुवार्तांतून धन्य करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची प्रेमप्रकरणातून उत्तम वाटचाल.

मानसन्मानास पात्र व्हाल

मीन : आपली गुरूची रास. गुरूच्या राशीतील मार्गशीर्ष अमावस्या पर्वणीसारखी साजरी करेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या विशिष्ट ध्येयपूर्तीची फळे देईल. सामाजिक मानसन्मानास पात्र व्हाल. ता. ८ व ९ हे दिवस मोठी महत्त्वाची कामं यशस्वी करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *