राशिभविष्य

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (१७ डिसेंबर २०२३ ते २३ डिसेंबर २०२३)

व्यावसायिक धनवर्षावाचा कालखंड

मेष : वक्री बुधाची स्थिती गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तम राहील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या सुवार्तांचा. घरातील तरुणांचा सुद्धा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा व्यावसायिक धनवर्षाव. पती वा पतीचा विलक्षण भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.

मोठी कामं होतील

वृषभ : सप्ताहात प्रवासातली कामं होतील. विदेशातल्या प्रवासामधल्या अडचणी जातील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून मोठा दिलासा मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० डिसेंबरची अष्टमी वैयक्तिक पातळीवर समारंभाची. सप्ताहात मृग नक्षत्राच्या व्यक्ती मोठी चैन, चंगळ आणि मौजमजा करतील. मित्रांच्या सहकार्यातून मोठी कामं होतील.

तरुणांना दिशा मिळेल

मिथुन : गीता जयंतीचा सप्ताह मोठी अनुभूती देणारा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एखाद्या पर्वणीसारखा राहील. ता. १९ ते २१ हे दिवस तरुणांना शिक्षण, नोकरी व विवाह या त्रिविध माध्यमांतून दिशा देणारे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातील सुवार्ता धन्य करतील.

परदेशी व्यापारातून लाभ

कर्क : सप्ताहात विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीचा अनुभव येईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ ते २१ हे दिवस गाठीभेटीतून चमत्कार घडवणारे. काहींना राजकीय लाभ शक्य. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी व्यावसायिक लॉटरी लागेल. परदेशी व्यापारातून लाभ होईल. नोकरीत बदलीतून लाभ होईल.

कर्तृत्वाला उजाळा मिळेल

सिंह : रवी-बुध सहयोगाची पार्श्‍वभूमी कर्तृत्वाला उजाळा देईल. सतत इतरांचं लक्ष वेधून घ्याल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती शत्रूंवर मात करतील. ता. २१ ते २३ हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. अर्थातच जाहिरात माध्यमातून लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीकडून लाभ.

नोकरीतलं सावट जाईल

कन्या : सप्ताह व्यावसायिक उमेद वाढवेलच. सप्ताह घरगुती सुवार्तांची परंपरा ठेवेल. घरातील तरुणांच्या चिंता जातील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या नोकरीतील भीतीचे सावट जाईल. ता. २० व २१ हे दिवस पती व पत्नीच्या चिंता घालवतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्ती सहकुटुंब पर्यटन करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअरबाजारातून लाभ होईल.

मुलाखतींतून नोकरी मिळेल

तूळ : सप्ताहातील उत्तरायण मोठ्या उत्कर्षाची लक्षणं दाखवेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या सेलिब्रेटी बनतील. ता. २१ ते २३ हे दिवस मोठे झगमगाटी राहतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना मुलाखतीतून नोकरीचा लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा गॉडफादर भेटेल. उद्याचा सोमवार महत्त्वाच्या कामांचा ठरेल.

चांदणं शिंपत नेणारा काळ

वृश्चिक : सप्ताह तरुणांना नोकऱ्या देणारा. काहींना व्हिसा मिळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ ते २१ हे दिवस मोठे मौजमजेचे राहतील. पुत्रोत्कर्षातून मोठा दिलासा. व्यावसायिक प्रदर्शनं यशस्वी ठरतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पर्यटनाचा सुंदर योग. वैवाहिक जीवनातून प्रसन्नता. ता. २१ चा गुरुवार चांदणं शिंपीत नेणारा.

सरकारी बहुमान लाभेल

धनू : उत्तरायणाच्या पार्श्वभूमीवरील रवी-बुध युती योग मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिकौशल्यातून मोठा लाभ देईल. विशिष्ट सरकारी बहुमानाचे मानकरी व्हाल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं परदेशगमन निश्चित होईल. अर्थातच व्हिसाची प्राप्ती होईल. ता. २१ ते २३ हे दिवस तरुणांच्या बाबतीत मोठे चौकार-षटकार मारतील.

परदेशगमनाचा योग येईल

मकर : शुक्र-हर्षल ग्रहांची प्रतियुती मोठे प्युअर सीक्वेन्स लावेल. शिक्षण, नोकरी व विवाह या त्रिघटकांतून भाग्य उलगडेल. श्रवण नक्षत्रास सप्ताहाचा शेवट नाताळातल्या जल्लोषाची पूर्वतयारी करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना खरोखर ‘बहारो फूल बरसाओ’ होईल. नोकरीतून परदेशगमन होईल.

बलवत्तर विवाहयोग

कुंभ : स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह तेजीचा. विशिष्ट करारमदार मोठी भाग्यबीजं पेरतील. शततारका नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट मोठा बॅटिंग फिल्डचा. नोकरीविषयक उत्तम मुलाखती होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मित्रांकडून लाभ देणारा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास बलवत्तर विवाहयोग, प्रेमिकांच्या आणाभाका फलद्रूप होतील.

मोठी व्यावसायिक रसद मिळेल

मीन : सप्ताह मोठी आत्मिक ऊर्जा देणारा. विद्यार्थ्यांचा उच्चशिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. काहींचं नोकरीतलं आसन बळकट होईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी व्यावसायिक रसद मिळेल. उत्तरा – भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताहाचा शेवट नियोजित कामांतून यश देणारा. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा वैवाहिक जीवनातला हट्ट पुरवला जाईल. पती वा पत्नीचा भाग्योदय नाताळ साजरा करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *