स्पर्धात्मक पातळीवर यश
मेष : पौर्णिमेचा सप्ताह सुवार्तांतून फास्ट ट्रॅकचाच राहील. भरणी नक्षत्राच्या तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश देणारा. ता. २३ ते २५ हे दिवस घरात तरुणांची कार्य ठरवणारं, अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचा गुरुपुष्यामृत योग रोजनिशीत किंवा फेसबुकवर हृद्य अशा प्रसंगांची नोंद करणारा ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती नवस फेडतील.
प्रवासात काळजी घ्यावी
वृषभ : बुध-मंगळ युतियोगाच्या हाय व्होल्टेजमध्ये प्रवासात हायवेवर काळजी घ्या. बाकी सप्ताहात ता. २३ ते २५ हे दिवस पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र गाठीभेटी, कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचा प्रस्ताव येईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारचा आधार मिळेल, अर्थातच मंत्र्यांकडून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी भावंडांशी वाद टाळावेत.
वादग्रस्त वसुली होईल
मिथुन : पौर्णिमेचा सप्ताह बुद्धिजिवींना सुंदरच. पौर्णिमेचा गुरुपुष्यामृत योग नोकरी-व्यावसायिक घडामोडींतून चांगलाच राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. व्यावसायिक वादग्रस्त वसुली कराल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या विवाहविषयक गाठीभेटी होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र भाजण्या-कापण्यापासून जपण्याचे.
वास्तुविषयक व्यवहार ठरतील
कर्क : गुरुपुष्यामृताची शाकंभरी पौर्णिमा घरात शुभ कार्ये ठरवतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमा मानसन्मानाची ठरेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस थोरामोठ्यांच्या भेटीगाठींचे. विशिष्ट वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासामध्ये चोरी किंवा नुकसानीची शक्यता.
कुसंगती व उन्माद टाळावा
सिंह : सप्ताहातील चंद्रबळाचा तरुणांना चांगलाच लाभ घडेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींच्या विशिष्ट ग्रासलेल्या गुप्तचिंता जातील. मुलाबाळांचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताहात काहींना मोठा राजकीय लाभ होईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कुसंगतीतून अडचणीत आणणारा ठरू शकतो. तरुणांनी उन्माद टाळावा. प्रेमप्रकरणं सांभाळावीत. बाकी पौर्णिमेजवळ नोकरीत भाग्योदय. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात सांभाळावं.
संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा
कन्या : सप्ताहातील बुध-मंगळाचं हाय व्होल्टेज तरुणांनी सांभाळावं. वाहनं सांभाळा. संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या घरात पौर्णिमा मुलाबाळांचा भाग्योदय करेल. तरुणांना ओळखी-मध्यस्थीतून विवाहस्थळं येतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार गाठीभेटीतून वादग्रस्त ठरण्याची शक्यता.
अडलेली कामं होतील
तूळ : पौर्णिमेपर्यंतचं वाढतं चंद्रबळ गुरुभ्रमणाच्या साथसंगतीतून मोठा लाभ देईल. अडलेली महत्त्वाची कामं होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ सप्ताहाचं सुंदर बजेट घोषित करेल. ता. २५ चा गुरुपुष्यामृत योग विलक्षण फळं देईल. घरात आनंदोत्सव साजरा कराल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा दुखापतींपासून जपण्याची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणात यश.
आर्थिक संकट दूर होईल
वृश्चिक : पौर्णिमेची ऊर्जा खेचून घ्याल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. ता. २३ व २४ हे दिवस छान रंगसंगतीचे. पुत्रोत्कर्षातून आनंद. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यातलं एखादं आर्थिक संकट गुरुपुष्यामृताची पौर्णिमा घालवेल. पती वा पत्नीचा भाग्योदय. नोकरीच्या संधी.
वाद-भांडणं टाळावीत
धनु : राशीतील बुध-मंगळाच्या हाय व्होल्टेजपासून जपलंच पाहिजे. शत्रूंपासून सांभाळा. गावगुंडांशी हुज्जती नकोत. घरगुती वादात पडू नका. बाकी सप्ताहाचा आरंभ गुरुबळाच्या साथसंगतीतून चंद्रकला उपभोगेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचा गुरुपुष्यामृत योग जुन्या गुंतवणूक फलद्रूप करेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगारसदृश व्यवहार टाळावेत. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार शारीरिक वेदनेतून बेरंगाचा.
वरिष्ठांचं सहकार्य मिळेल
मकर : सप्ताहातील चंद्रबळाचा सर्वोत्तम लाभ घ्याल. तरुणांना सप्ताहारंभ उत्तेजना देणारा. नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह प्राप्त होईल. पौर्णिमेचा गुरुपुष्यामृत योग श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातून धन्य करणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक घबाड योगाचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार हाय व्होल्टेजचा.
खरेदी-विक्रीतून फसगतीची शक्यता
कुंभ : पौर्णिमेचा सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देईल. तरुणांनी कोणताही उन्माद टाळावा. कुसंगतीतून अडचणीत याल. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींची पौर्णिमेच्या गुरुपुष्यामृत योगाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट धनचिंता जाईल. घरात विशिष्ट कार्ये ठरतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खरेदी-विक्रीतून फसगतीचा.
व्यावसायिक पातळीवर चांगला काळ
मीन : पौर्णिमेच्या सप्ताहात चंद्रबळातून गुरुभ्रमणाचा लाभ उठवाल. पौर्णिमेचा गुरुपुष्यामृत योग उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना जीवनातील उत्तम भेटवस्तू देऊन जाईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. ता. २३ ते २५ हे दिवस रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर मोठ्या उलाढालींचे ठरतील.