सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे विद्यापीठातील सेट विभागाचा गलथान कारभार यामुळे उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.
त्यावेळी प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. त्याचबरोबर परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
दरम्यान अनेक वेळा पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.
काशाबाई नवले कॅालेज परीक्षा केंद्रावरील गोंधळ सुरू असून सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले आहेत. परीक्षा केंद्रावर पोलीस बोलावण्यात आले आहेत.