दोन्ही देशांमध्ये सुरू झालेले हे युद्ध जवळपास १३ दिवस सुरू होते.
India Pakistan 1971 War : आजच्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने संध्याकाळी ५.४५ मिनिटांनी भारताच्या हवाई तळावर हल्ला केला पाकिस्तानच्या या एका छोट्या चुकीमुळे १९७१ मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाला सुरूवात झाली.
भारताने नैतिकतेने जिंकले
भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने परदेशी पत्रकारांना सैन्यासोबत जाण्याची परवानगी दिली होती. यामुळे युद्धभुमीवरील प्रत्येक माहिती जगापर्यंत अचूक मिळत होती. या युद्धादरम्यान भारताने ही लढाई नैतिकतेच्या जोरावर जिंकली हेदेखील यामुळे जगाला समजले.
आणि पाकिस्तानचे झाले दोन तुकडे
दोन्ही देशांमध्ये सुरू झालेले हे युद्ध जवळपास १३ दिवस सुरू होते. या काळात भारताने पायदळ, नौदल आणि हवाई दलातील सैन्याच्या जोरावर मोठा विजय मिळवला. आतापर्यंतच्या लष्करी इतिहासात केवळ १३ दिवसात संपणारे हे सर्वात लहान युद्ध आहे. या युद्धात ९३ हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक पकडले गेले होते, ही दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी युद्धकैद्यांची संख्या असून, या युद्धातून पूर्व पाकिस्तान मुक्त झाला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली.
भारताला हवे असते तर ते पश्चिम पाकिस्तानच्या दिशेने पुढे जाऊ शकले असते. पूर्व पाकिस्तानवरील विजयानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तसे ठरवले असते तर, हे शक्य झाले असते. मात्र, तसे झाले नाही. पेंग्विनने प्रकाशित केलेल्या १९७१: स्टोरीज ऑफ ग्रिट अँड ग्लोरी फ्रॉम द इंडो-पाक वॉर या पुस्तकात मेजर जनरल इयान कार्डोझो (निवृत्त) यांनी काही अनुभव लिहिले आहेत. कार्डोझो या दरम्यान मेजर होते. त्यांच्या प्लाटून ‘फोर-फाइव्ह जीआर’ ला पूर्व पाकिस्तानातील सिल्हेट काबीज करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, जी त्यांच्या प्लाटूनने अतिशय चोखपणे पार पाडली.