ताज्या बातम्या

Accident News: मुंबई-नाशिक महामार्ग की अपघातांचा सापळा; १० महिन्यात झाले तब्बल इतके अपघात!

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर तब्बल ६५७ अपघात झाले आहेत. यामध्ये 370 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.

2019 मध्ये वर्षभरात 815 अपघात झाले. त्यापैकी ४१३ अपघातांमध्ये ४७२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी अपघातांची संख्या वाढली असून, वर्षभरात 868 अपघात झाले होते. यातील ४४२ अपघातांमध्ये ४८१ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाही अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी 10 महिन्यांत 657 अपघात झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

काही वर्षांत मुंबई-नाशिक महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. या महामार्गाला गावालगतचे अनेक स्थानिक रस्ते जोडलेले आहेत. महामार्गावरून गाड्या बेदरकारपणे चालवल्या जात असून सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अपघात संख्या
वर्ष – अपघात – मृत्यू
२०२१ – ८१५ – ४७२
२०२२ – ८६८ – ४८१
२०२३ (ऑक्टोबरपर्यंत) ६५७ – ३७०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *