Akola Government Hospital: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सोमवार, ता. २९ जानेवारी अतिशय निंदनीय प्रकार घडला. एका ८० वर्षांच्या आजीला स्ट्रेचरवरून खाली टाकून दोन महिला कर्मचाऱ्यांनी पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली व वृद्ध रुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जाताना कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
सर्वोपचार रुग्णालयात जेथे सकाळच्या सत्रात ओपीडी होते, तेथे पायऱ्यांच्या खाली वृद्ध महिला रुग्णाला स्ट्रेचरवरून टाकून दिले, व तिथून कर्मचारी निघून गेले. कितीतरी वेळ ही वृद्ध रुग्ण तेथेच पडलेली होती.
याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला व कर्मचाऱ्यांनी त्या महिला रुग्णाला उपचारासाठी वार्डात घेवून जाण्याची व्यवस्था केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी केली.